सोलापूर – सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने काही काळ लॉकडाऊन जाहीर केला होता. पण त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तर पेरणी करायला सुद्धा पैसे नाहीत आणि एकीकडे बँक कर्ज देखील देण्यास नकार देत आहेत. त्यामध्येच मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पाऊस झाला होता त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे व बागांचे खूप नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झालेय. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागांचे त्यासोबतच पिकांचे वादळी वारा आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु त्याची भरपाई अजून देखील मिळाली नाही. सातत्याने पाठपुरावा करुनही त्याची काही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.३) तहसीलसमोर धरणे आंदोलन करताच, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले.
कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी – बाळासाहेब थोरात
हे आंदोलन संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरीतील ५९ शेतकरी, पाटकूलचे १८९ शेतकरी, तसेच तालुक्यातील इतर काही गावांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्याबाबत देशमुख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार
मोहोळ तहसिल कार्यालयासमोर ११ ते ५ या पाळत जमावबंदीचा व सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सायंकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित बँकेने पैसे जमा केले.
महत्वाच्या बातम्या –
पपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका !