विकेंड लॉकडाऊन संपताच ‘या’ जिल्ह्यातील मार्केट यार्डात सकाळपासूनच तुफान गर्दी

पुणे – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याच्या इतर भागांपेक्षा पुण्यात अधिकच परिस्थिती भीषण बनली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यामध्ये रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊनही जाहीर केला होता. मात्र, हा विकेंड लॉकडाऊन संपताच पुण्यातील मार्केट यार्डात सकाळपासूनच तुफान गर्दी झाली.

दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर फळ आणि भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डमध्ये घाऊक आणि किरकोळ ग्राहकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेल्याचे चित्र बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले.या गर्दीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने प्रशासन घेत असलेली सर्व मेहनत पाण्यात जाणार असेच सध्यातरी दिसून येत आहे.

दरम्यान,एका बाजूला लसीकरणासाठी लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने मोठे राजकारण पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. रुग्ण वाढीत फारशी घट झाली नसूनही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवबाधितांच्या संख्येच्या जवळपास बरोबरीत आल्यानं शनिवारी मिळालेला दिलासा 24 तासही टिकला नाही.

काल नवबाधितांच्या दैनंदिन संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्याही शनिवारपेक्षा बरीच कमी होती. दैनंदिन बाधितांची संख्या काल प्रथमच 60 हजाराच्या पुढे गेली. काल राज्यात 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित आढळले. ही संख्या पहिल्या लाटे मध्ये सप्टेबरच महिन्यात नोंदवल्या गेलेल्या उच्चांकापेक्षा दुप्पट आहे. तुलनेत काल राज्यात 34 हजार 8 रुग्णच बरे झाले त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेपाच लाखाच्या पुढे गेली. दैनंदिन मृत्यूसंख्याही आता साडेतीनशेच्या जवळ पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या –