अन्न शिजवल्यामुळे निघून जातात ‘हे’ महत्वाचे घटक

शिजवलेले, प्रक्रिया केलेले आणि बंद पकिटातील अन्न खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असतात. शिजवल्यामुळे अन्नामधून व्हिटॅमीन सी आणि पचनासाठी उपयुक्त असणारे घटक निघून जातात. तुम्ही म्हणाल भाजी शिजवल्याशिवाय कशी खाणार? मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, कच्च्या भाज्या खाणं हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

संशोधनातून असे लक्षात आले की, कच्च्या भाज्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मक बदल होत होता. या फळे आणि भाज्यांमध्ये गाजर, केळी, सफरचंद, काकडी, किवी, टोमॅटो, कोबी, कांदा यांचा समावेश होता.हे संशोधन जर्नल फ्रंटियर्स इन सायकाॅलॉजीमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलंय. संशोधकांच्या सांगण्यानुसार, कच्च्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने डिप्रेशन आणि ताणतणाव याची लक्षणे कमी झाल्याचे दिसून आले.