काही दिवसांपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत आहोत असं सांगत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले मात्र आता सत्तेत येण्यामागे नेमकी काय कारणे होती याचा उलगडा होऊ लागला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच गाजत आहे. नांदेड येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात केलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हटले होते की, मुस्लिमांच्या आग्रहामुळे आणि भाजपला रोखण्यासाठी आम्ही शिवसेनासोबत सरकार स्थापन केले आहे. अन्य़था भाजप पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेत आली असती. मुस्लीम बांधवांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अशोक चव्हाण व शिवसेनेवर टीका केली आहे. तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागे हेच उदिष्ट होते का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?
महाराष्ट्रात आता आमचे सरकार आहे. भाजपचे संकट आणखी पाच वर्षे महाराष्ट्रावर नको म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल, असे पक्षात सर्वांचे मत बनले. त्यातच अनेक मुस्लिम बांधवांनीही तसा आग्रह आमच्याकडे धरला. तो आग्रह मान्य करून आम्ही राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालो. आता आमचे सरकार महाराष्ट्रात असल्याने तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. हे सरकार असेपर्यंत महाराष्ट्रात सीएए लागू होणार नाही.
दरम्यान भाजपने यामुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. चव्हाणांच्या या विधानावर शिवसेना गप्प का आहे ?, असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे