अपंगसमावेशीत शिक्षण योजनेचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आढावा

नाना

मुंबई – राज्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आलेल्या अपंग समावेशीत योजनेचा आढावा आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला. यावेळी योजनेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे वेतन तातडीने दिले जावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

गेल्या २० दिवसात ८४ हजार ११८ रुग्ण कोरोनामुक्त – राजेश टोपे

राज्यात अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग समावेशीत योजना योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेळेत वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.  या शिक्षकांना तातडीने वेतन मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत अशा सूचना श्री.पटोले यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक श्रीमती अश्विनी जोशी आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महतवाच्या बातम्या –

जाणून घ्या कारल्याचे फायदे…

आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद