फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार

उद्धव ठाकरे

नांदेड – महाराष्ट्र सरकारनं राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. यातून शेती, घरं, पूल आणि रस्ते यांच्यासाठी नुकसान भरपाई तसंच पावसामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 10 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल आणि ती दिवाळीपूर्वी मिळेल, असं त्यांनी जाहीर केलं. फळबागांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.त्यात जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहोत. फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही मदत तुटपुंजी आहे व सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत अशी टीका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात खरीब हंगामात शेती पिकांचे नुकसान झाले.जमीन खरबुड गेली आहे. राहत्या घरांचे नुकसान झाले आहे,शेतकरी पार कोडमडला आहे.शेतकऱ्यांनी घरातील सोने नाणे,लहान मुलांचे खाऊचे पैसे काढून,कर्ज घेऊन या वर्षी दुबार-तीबर(बोगस बियाणे) पेरणी केली होती.या सर्व बाबींची नोंद आजच्या पॅकेज मध्ये नाही.

कर्ज माफी योजनेतील थकबाकीदार २ लाख वरील आणि चालू खात्यादार शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा करतो म्हणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. हा घेतला नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढ होत आहे.

अतिवृष्टीमुळे पीक विमा योजना १००% लागू होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री महोदयांनी यावर बोलण्यासाठी तयार नाहीत.आजच्या पॅकेज कडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले होते ,शेतकऱ्यांची भ्रमनिरास झाला आहे.जिरायत व बागायती शेतीतील फरक मुख्यमंत्र्यांना कळतो का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या –