फेब्रुवारीच्या अखेरीस कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा : दादा भुसे

राज्यातील कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाचे  कामकाज यांचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री मंगळवारी (ता.२८) पुणे कृषी महाविद्यालयात आले होते. महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये दोन लाखांपर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्यासाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार माहिती घेण्याचे काम हे वेगाने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटी कर्ज माफीची रक्कम प्रत्यक्ष बॅंक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली.

तसेच यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे या कर्जमाफीला जरी फसवी म्हणत असले, तरी ते आता विरोधी पक्षात आहेत आणि असे बोलणे हे त्यांचे काम आहे. पण, मार्चमध्ये राज्यातील सर्व शेतकरी हे स्वतःहून या योजनेबाबत चांगले बोलताना तुम्हाला दिसतील.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी मला दिली आणि त्यांनतर मी सर्व कामकाज हे समजावून घेत आहे त्यामुळे  आजचा दौरा त्यासाठीच आहे. त्याचप्रमाणे कृषी विभागाला चांगली दिशा दिली जात आहे हे तुम्हाला दोन-तीन महिन्यांत दिसून येईल, असेही ते म्हणाले.

तसेच यावेळी ते महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत म्हणाले की, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाबत २०१३ मध्ये नियुक्त केलेल्या समितीने अहवाल दिला आहे पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, आमच्या अजेंड्यावर असलेल्या मुद्द्यांपैकी ‘विद्यापीठ विभाजन’ हा एक मुद्दा आहे.

पुणे कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विषय माझ्या कानावर आलेला आहे. मी याबाबत माहिती घेत आहे, असे कृषिमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. ‘संविधानाच्या बाहेर काम करणार नाही, हे शिवसेनेकडून लिहून घ्या,’ असे काँग्रेस श्रेष्ठींनी सांगितल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, की अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलण्याइतका मी मोठा माणूस नाही आहे. मात्र, सर्वांनी घटनेनुसार काम करणे अपेक्षितच आहे.

रब्बी हंगामात दहा जिल्ह्यांमध्ये पिकविम्यासाठी कंपन्यांनी निविदा भरलेल्या नाहीत. जर निविदाच भरलेल्या नाहीत तर या जिल्ह्यांमध्ये अडचणी आल्यास काय करावे लागेल; तसेच एकूणच विमा धोरण काय असावे, यासाठी राज्य शासनाची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांची गरज – अजोय मेहता

वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेने दिले आदेश

‘पवारांनी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ – चंद्रकांत पाटील