राजेश टोपे यांच्या बैठकीत शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

राजेश टोपे

जालना – जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा शेतकरीसेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी आहे.

सेवली परिसरात या शेतकऱ्याची  जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी आपला हक्क सांगून बळकावली असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील या संदर्भात कारवाई होत नसल्यानं निवेदन देण्यासाठी आठवले जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले होते.

या दरम्यान टोपे यांची आढावा बैठक सुरु असताना आठवले यांनी जमिनीवरील कब्जा केल्याचा आरोप करत विषाची बाटली तोंडात ओतून विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.
या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकाच खळबळ उडाली. घटनेनंतर लगेचच सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता .

महत्वाच्या बातम्या –