मुंबई – हजेरी सहाय्यकांच्या पेन्शनसह विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
मंत्रालयात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांविषयी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, किसन कथोरे, माजी आमदार विजय गव्हाणे, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, नरेगा आयुक्त शंतनु गोयल, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रोजगार सहायकांच्या सेवानिवृत्ती, शासकीय सेवेत नियमित करणे, रूजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरावे, अशा विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शक्य असणाऱ्या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.
सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा. यासाठी दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री.भुमरे यांनी सांगितले.
यावेळी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यातील कामांचा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी संबंधित अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कामे उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश श्री.भुमरे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सावधान! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता