माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटलांवर महिला पत्रकाराने केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करून खळबळ उडवून दिली असताना आता आणखी एक असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्रकार संध्या मेननने महिला पत्रकारांना आलेले अनुभव तिने ट्विट केले आहेत. हे अनुभव लेखक किरण नगरकर, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर पाब्लो बार्थलोम्यू या तिघांच्या बाबतीतले आहेत. या तिघांनी लैंगिक गैरवर्तन कशाप्रकारे केले हे सांगणारे ट्विट्स संध्या मेननने ट्विट केले आहेत.

पत्रकार संध्या मेनन यांनी हे ट्वीट केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोशल मिडीयावर देखील याची बरीच चर्चा होत आहे. या खळबळजनक आरोपानंतर बीजी कोळसे पाटील यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप संघाच्या माथी फोडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला या प्रकरणात अडकवू पाहत असल्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं त्या दिवशी ?

बी. जी कोळसे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेले तेव्हा बाहेर खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरात गेलो. मुलाखत संपली तेव्हा खुर्ची उचलत असताना ती त्यांना लागली. मी त्याबद्दल त्यांना सॉरीही म्हटले आणि वळले तेवढ्यात त्यांनी माझ्या शर्टची कॉलर खेचली आणि म्हटले की तू तुझ्या कुर्त्याचं वरचं बटण उघडं का ठेवलं आहेस? त्यानंतर मला ते सॉरी म्हटले पण जे काही घडले ते मी विसरू शकलेले नाही.

निवृत्त न्यायमूर्ती माझ्याशी असे वर्तन करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपण मित्र आहोत असे मला वाटले म्हणून मी असे केल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र इथे जे काही घडले ते बाहेर कोणालाही सांगू नकोस अशा विनवण्या त्यांनी मला वारंवार केल्या आणि माझी ते माफीही मागत राहिले. जर इथे जे काही घडले ते तू बाहेर सांगितलेस तर मी संपून जाईन असेही त्यांनी मला सांगितले. मी त्यांचे घर सोडले आणि निघाल्यानंतर काही क्षणात त्यांचा मला फोन आला आणि माझ्या विरोधात कोणाही कडे काही बोलू नकोस असे मला त्यांनी जवळजवळ धमकावलेच.

मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत;बी. जी. कोळसे पाटलांची मुक्ताफळे

#JusticeForAsifa: असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात,मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप