दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू उतरले शेतकऱ्यांसाठी मैदानात

बच्चू कडू

दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह भाजपने यां आंदोलनात उडी घेतली आहे.

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे.

राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांना या आंदोलनावरुन भाजपला चिमटा काढलाआहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे दुधाला किती भाव देण्यात येतो हे लक्षात घ्या. केवळ राजकारण करु नये, असा सल्लाही भाजपला दिला.

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आज भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजपने आंदोलन करतांना केंद्रातून निधी कसा आणता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. या देशात केंद्र सरकारात आपण आहात. केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपण दुधाला किती भाव देतो हेही तपासले पाहिजे, फक्त राजकारण करायचं म्हणून आंदोलन करु नये, असे बच्चू कडू म्हणाले.

तसेच मी सुद्धा दूध आंदोलक शेतकऱ्यांच्या सोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू परंतु यामध्ये केंद्र सरकारचा ही खारीचा वाटा असला पाहिजे त्यामुळे केंद्र सरकारनेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच नाही तर कमीत कमी दोन रुपये तरी अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा या देशात केंद्र सरकार पण आहे त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असे बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे