बच्चू कडू यांनी केले खुल्या दिलाने मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती- नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी देशातली पहिली किसान रेल्वे सेवा सुरु झाली आहे. हि रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार असून यातून भाजी व फळांची वाहतूक होणार आहे.

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार या रेल्वेसेवेचा प्रारंभ केल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. हि रेल्वेगाडी आज देवळाली स्थानकावरून निघून सुमारे ३२ तासांनी दानापूर इथं पोचेल.

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी

पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप (PPP) याद्वारे कोल्ड चेन आणि शेतमालाची वाहतूक व विक्री करण्याची ही सेवा असणार आहे. कोल्ड सप्लाय चेन सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिली रेल्वे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांतील शेतकऱ्यांना जोडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार ही नवीन सेवा सुरू केली जात आहे. या रेल्वेद्वारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे यांची वाहतूक योग्य पद्धतीने करण्याची सोय केली जाणार आहे. या पहिल्या ट्रेनद्वारे नाशिक भागातील कांदा पटना, इलाहाबाद, कटनी, सतना या शहरात आणि त्या भागात पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

या रेल्वेसेवेचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली असून नाशिक, मनमाड, भुसावळ इत्यादी परिसरातल्या फळे, फुले, कांदा तसंच भाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. यासाठी नाशिक जवळच्या लासलगाव इथं तापमान नियंत्रित गोदाम बांधण्याचे काम सुरु झालं आहे.
दरम्यान, किसान रेल्वे योजना सुरु केल्याबद्दल रविवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

आता राज्याच्या इतर भागांतूनही किसान रेल्वे सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. यासोबतच मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाली तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या –

पुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन

आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक – राजेश टोपे