…तेव्हा पवारांची मर्दानगी कुठे अडली होती? : बच्चू कडू

पुणे: राज्यभरातील शेतकरांच्या स्थितीवरून बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष् शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावण्याचा पवारांना अधिकार नसल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. स्वामिनाथन आयोग २००६ ला लागू झाला तेव्हा तुम्ही तो का मान्य केला नाही.तेव्हा तुमची मर्दानगी कुठे अडली होती असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत कडू पवारांवर टीकेची झोड उठवली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू ?
ते वयाने जरी मोठे असले असले तरी.त्यांनी स्वतःला विचारावे की शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावण्याचा अधीकार मला आहे का ? त्यांनी हा अधिकार गमावला असून आता प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार त्यांच्याजवळ नाही.पवार कृषिमंत्री होते, स्वामिनाथन आयोग २००६ ला लागू झाला तेव्हा तुम्ही तो का मान्य केला नाही?तेव्हा तुमची मर्दानगी कुठे अडली होती.तेव्हा आम्ही टोकाची भूमिका घेतली असती आणि तुमच्या गाडीखाली फटाके फोडले असते तर काय वाटलं असत?पवार सत्तेबाहेर असल्याने टोकाची भूमिका घ्यायला सांगत आहेत.

… तर दानवेंना घरात घुसून मारेल- बच्चू कडू
दानवेंनी शेतकऱ्यांना फक्त साल्या म्हंटलं होतं, दानवेच्या घरात जाऊन ऊबंरठ्यावर जाऊन सांगितल की साल्या आता शिव्या दिल्या तर घरात घुसून मारेल. कारण शेतकरी आमची जात आहे शेतकरी आमचा धर्म आहे. दानवे आणि बच्चु कडु यांच्यातील हा वाद नाही.तर शेतक-याला शिव्या शाप देणा-या साल्या म्हणणा-या दानवेविरोधातील ही लढाई आहे.हरामखोरीनं कमावलेला पैसा दानवेवकडे आहे, पोरासाठी तो 200 कोटी रुपये खर्च करतो.आणि असा हा भ्रष्टाचारी दानवे, न खाऊगा न खाने दुगां अस म्हणणा-या मोदीसाहेबांच्या भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. म्हणजे यावरूच हे लोक किती भामटे आहेत. ते दिसत. अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलीये.

पहा बच्चू कडू यांची संपूर्ण मुलाखत