दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू कडू म्हणाले आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना किती लुटलं गेलं याचा हिशोब सरकारने दिला तर त्यांच्याकडेच आमचे पैसे निघतील, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
गुडघ्यांच्या दुखण्यावर ‘एरंडेल तेल’ गुणकारी
यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते एनआरसीला समर्थन करतील, असं वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला भाजपला दिला.
गर्भपात झाल्यानंतर पुन्हा आई होण्यासाठी घ्या ही काळजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदूंच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊ नये असं पत्रक काढणाऱ्या संघटनेला गांभीर्याने घेऊ नका, असं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडूंनी केलं आहे. तर तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचार ही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच सरकारला टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी https://t.co/z3BoqtG1Zq
— Krushi Nama (@krushinama) February 7, 2020