…तर महादेव जानकर यांना नंदीबैलावर फिरवू : बच्चू कडू

सोलापूर : महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा सवाल उपस्थित करीत महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्य़क्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला. आहे.

दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी कडू नुकतेच सोलापूर महापालिकेत आले होते. ते म्हणाले, उसाचे पाच हजार कोटी भेटले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले. महादेवाचे वाहन नंदीबैल आहे. दुधाला योग्य भाव न मिळाल्यास नंदीबैलावरूनच जानकर यांना फिरवण्यात येईल.

दरम्यान, काल राजू शेट्टी यांनी देखील पुण्यात पत्रकार परिषद घेवून सरकारवर दुधाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. दुधाच्या भुकटी चे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात125 ते 140 पर्यंत पोहचले आहेत.दुधाच्या पावडरीचे साठे वाढत असल्याचे मी कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोप त्यांनी केला . योग्य त्या उपाययोजना न केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांनी किती दिवस तोटा सहन करायचा?लिटरला कमीतकमी 5 रुपये शेतकऱ्यांचा अकाऊंट ला जमा करावेत.महाराष्ट्रात असं जर केलं तर 900 कोटी लावतील हे सरकारला अवघड नाही.दुधाला भाव मिळावा हीच आमची मागणी आहे आणि तोही घसघशीत मिळावा.अमूल असो किंवा इतर कोणती संस्था आम्हाला काही आक्षेप नाही मात्र मंदीच्या काळात शेतकऱ्यांना अमूलने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये असं देखील ते म्हणाले.