Bajaj Pulsar | बजाजने लाँच केली Pulser P150 बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Bajaj Pulsar | बजाजने लाँच केली Pulser P150 बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज (Bajaj) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन फीचर्ससह बाईक (Bike) लाँच करत असते. अशात बजाज ऑटो (Bajaj Auto) ने आपल्या पल्सर सिरीजची नवीन बाईक पल्सर P150 (Pulser P150) देशात लाँच (Launch) केली आहे. बजाजची ही नवीन बाईक 150cc सेगमेंटची आहे. ही बाईक भारतीय बाजारामध्ये दोन प्रकारात उपलब्ध आहेत. यामध्ये सिंगल-डिस्क आणि ट्विन-डिस्क यांचा समावेश आहे. ही बाईक एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही बाईक बाजारामध्ये 5 रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू, कॅरिबियन ब्लू, एबोनी ब्लॅक व्हाईट आणि रेसिंग रेड या रंगाचा समावेश आहे.

बजाज पल्सर P150 लुक

बजाज पल्सर P150 या बाईकच्या सिंगल-डिस्क प्रकारामध्ये सिंगल-पीस सीट उपलब्ध आहे. तर दुसरीकडे ट्विन-डिस्क बाईकमध्ये स्प्लिट-सीट सेटअप आणि स्पोर्टियर रायडिंग पोझिशन दिली आहे. बजाजने पल्सर सिरीज मधील या नव्या बाईकला नवीन लुक दिला आहे. ही नवी बाईक स्पोर्टी असून हलकी आहे. त्याचबरोबर या बाईकला एलईडी लाइटिंगसह मस्क्युलर फ्युल टॅंक देण्यात आलेला आहे.

फीचर्स

बजाज पल्सर P150 ही बाईक 790mm एवढी उंच आहे. म्हणजे सामान्य उंचीची लोक ही बाईक आरामात चालवू शकतात. या बाईकमध्ये एक इन्फिनिटी डिस्प्ले देखील देण्यात आलेला आहे ज्यामध्ये, क्लॉक फ्युएल इकॉनोमी, गेअर इंडिकेटर इत्यादी गोष्टींचे डिटेल्स उपलब्ध असतील. त्याचबरोबर यामध्ये एक युएसबी सॉकेट चार्जिंग पॉइंट देखील दिलेला आहे.

इंजिन

बजाज पल्सर P150 बाईकमध्ये 149.68cc इंजिन देण्यात आलेले आहे. जे 8,500rmp वर 14.5PS पॉवर आणि 6,000rmp टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यामध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक देण्यात आलेला आहे. ही बाईक वजनाने हलकी आहे.

किंमत

बजाजने लॉंच केलेल्या नवीन पल्सर सिरीजच्या बाईकच्या सिंगल-डिस्क व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत 1.16 लाख रुपये एवढी आहे. तर या बाईकच्या ट्विन-डिस्क व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत 1.19 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या