Balasaheb Thorat | “…तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला पर्यटन करत होते”; सीमावादावरून बाळासाहेब थोरात यांची सडकून टीका 

Balasaheb Thorat | "...तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला पर्यटन करत होते"; सीमावादावरून बाळासाहेब थोरात यांची सडकून टीका 

Balasaheb Thorat | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “सीमाभागातील कानडी अत्याचाराबाबत मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे कळत नाही. त्यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सीमावादावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री गप्प बसलेले बघायला मिळते आहे. हे योग्य नाही.”

“जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात दाखल सीमाप्रश्नाच्या प्रकरणासंदर्भात वकिलांशी चर्चा करत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहटीला पर्यटन करत होते”, अशी बोचरी टीकाही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केलीय.

सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री गंभीर आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे धोरण, भूमिका स्पष्ट करावी. तसेच या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावून याप्रकरणी सर्वांशी चर्चा करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :