बळीराजा हतबल; राज्यातील शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट

शेतकरी

जळगाव – एकीकडे राज्यावर कोरोना व्हायरमुळे मोठं संकट आले आहे. अशात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचं आभाळ कोसळलं. त्यात राज्यावर मोठं आसमानी संकट आलं होत. जळगाव जिल्ह्यातील रावेर भाग हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) रोगामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे.

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

यावर्षीही पुन्हा हा व्हायरसने डोके वर काढल्याने केळीची रोपे उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रोगामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून येत असून हे टिश्यू कल्चर केळी रोपे जैन या जळगावातील प्रसिद्ध कंपनीचे असून या रोपांमध्ये कुठल्याही प्रकारची रोग प्रतिकारक शक्ती कंपनीने तयार केली नाही.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या

यामुळे तीन वर्षांपासून हा रोग जास्त थैमान घालत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. जुलै महिन्यात लागवड केलेल्या टिश्यू कल्चर रोपांवर या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, जिल्ह्यातील किमान दोन हजार हेक्टर्स केळीवर हा रोग आला आहे.

शेतकऱ्यांनी यातील किमान दोनशे हेक्टर्स केळी उपटून फेकली आहेत. संततधार पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. परंतु शेतकरी सांगतात की, टिश्यू कल्चर केळी रोपे जुलैत लागवड झाली असून याच रोपांवर हा रोग आला आहे. त्यामुळे याची भरपाई संबंधित कंपनीने करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

महतवाच्या बातम्या –

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या