पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार भरपाई- चंद्रकांत पाटील

मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला होता. त्यामध्ये केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत. त्यांचे पंचनामे आल्यानंतर या केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात येणार आहे, असे श्री.पाटील यांनी सांगितले.