वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला

वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला

मोठ्या वृक्षांची संख्या घटत असल्याने वटवाघळांनी आपला मोर्चा आता द्राक्ष बागांकडे वळविला आहे. द्राक्षमण्यांमध्ये गोडी आल्याने आता वटवाघळांकडून द्राक्षाचा फडशा पाडला जात आहे. १० -१५ वर्षांपासून सुरू असलेले नुकसान दिवसेंदिवस वाढत असल्याने द्राक्ष उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वटवाघळांचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील गोळेगांव येथील द्राक्ष बागांना बसत आहे.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

या परिसरात निर्यातक्षम द्राक्ष बागासुमारे ५०० हेक्टरवर असून, वटवाघळांकडून एका रात्रीत द्राक्ष फस्त करण्याबरोबरच न पिकलेली द्राक्ष कुरतडून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण दररोज सुमारे ६० ते ७० किलोपर्यंत आहे. यामुळे ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळणारी द्राक्षांना १० ते २० रुपये दर मिळत आहे.

नागपूरसह विदर्भात पावसाने लावली हजेरी

गोळेगांवसह तालुक्यातील नारायणगाव, खोडद, आर्वी, गुंजाळवाडी परिसरातील द्राक्षांचे देखील नुकसान होत आहे. वटवाघळांची वस्तीस्थाने, अधिवास हा वड, उंबर, पिंपळ, नंदृक, आंबा, जांभूळ, सिंदी, ताडी, माडी या फळझाडांवर असतो. मात्र, ही मोठी झाडे दिवसेंदिवस कमी होत असल्याने, वटवाघळांची वस्तीस्थाने नष्ट होऊ लागली आहेत. याचा परिणाम वटवाघळे द्राक्षांवर येण्यास सुरू झाला आहे.