सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये २ दिवस जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

मुसळधार पाऊस

मुंबई –  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या दिशेने आद्रतायुक्त वाऱ्यांचे मिलन होत आहे. त्यामुळे पुढील २ दिवस दिवस मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपीटीचा इशारा भारतीय हवामान  विभागाने दिला आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पुढील २ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टरबन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात पुढील २४ तासांत पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता असून मध्य भारतात ११ ते १२ जानेवारी दरम्यान विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्‍याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

महत्वाच्या बातम्या –