सतर्क राहा! ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मुसळधार

दिल्ली –  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पूर्वोत्तर राज्यामध्ये गारपिटीसह, जोरदार (Heavy) पावसाची शक्यता आहे.

तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती  हवामान विभागानेदिलेली आहे. तर देशातील  दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबच्या राज्यांमध्ये  मैदानी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्व राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आजही दिल्लीत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –