सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसासह गारपीट होण्याची शक्यता

पावसासह गारपीट

मुंबई –  हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार  आज 21 जानेवारीला तुरळक ठिकाणी पावसासह गारपीट (Hail with rain) होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. तर राज्यात काही ठिकाणी गरपती झाल्या. तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.हवामान विभाग

हवामान (Weather)  विभागाच्या अंदाजानुसार खान्देश , विदर्भ या भागात गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे. थंडी च्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –