मुंबई – डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार. पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी (Stormy) पावसासह गारपिटी (Hail) पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार, अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या दिशेने आद्रतायुक्त वाऱ्यांचे मिलन होत आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस दिवस मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपीटीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात पुढील २४ तासात वादळी (Stormy) पावसाची शक्यता आहे. तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत पुढील २४ तासात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टरबन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात पुढील २४ तासांत पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता असून मध्य भारतात १० ते १२ जानेवारी दरम्यान विजांच्या कडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- जिल्हा वार्षिक योजनेच्या 248 कोटी 66 लाख 53 हजार प्रारूप खर्चाच्या आराखड्यास मान्यता
- वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता