सावधान! शेतातील बांध कोरताय? काय आहे कायदा आणि शिक्षा; वाचा सविस्तर.

कायदा

भावा – भावात, गावा – गावात भांडण्याचा वादाचा एकच मुद्दा सर्वाधिक असतो तो म्हणजे शेतातील बांध !

शेतातील बांधामुळे मारामाऱ्या, खून, वाईटपणा येणे, त्यात आयुष्यभर कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. शेतातील बांधामुळे सर्वाधिक केसेस ग्रामीण भागातील कोर्टात चालतात.कधी कधी शेतात मशागत करताना दुसऱ्याच्या वावरत नजरचुकेने ट्रकटर शिरले जाते त्यामुळे गुन्हा दाखल होईल मालकावर तसेच चालवणाऱ्या ट्रकटर ड्रॉयव्हर असे सध्या राज्यात whatsapp द्वारे संदेश फिरत आहेत त्यासाठी आपण आज सत्य जाणून घेणार आहोत बघुयात काय आहे कायद्यात ह्या बाबद तरदूत

बघुयात आपल्या राज्यात या बाबत काय कायदा(Law) आहे.
१९६६ – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यामध्ये शेतीच्या सीमा तसेच चिन्हे ह्या मध्ये नववे प्रकरण आहे. त्यात शेतीच्या सीमा निश्चित करणे त्याबद्दलच्या वादाचे निराकरणं करण्याचा उल्लखे असून शेतीच्या सीमाबद्दल वाद तयार झाला तर पुरावा सादर करून जिल्हाधीकारी त्यात दुरुस्ती करतात. व्हायरल मेसेज मध्ये फिरत होते कि मालक व ट्रकटर चालक ह्यांनी बांधा मध्ये फेरफार केल्यास ट्रकटर जप्तीची व अटक कारवाई केली जाते हे चुकीचे मेसेज व्हायरल होते आहे.
परंतु महाराष्ट्रात महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात शेतीच्या बांधाचा वाद मिटवण्यासाठी वेगळी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे परंतु जप्तीची कारवाई असे नमूद केलेगेलेले नाही, सध्या बांधावरील निशाणी हलवण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बांध काढून टाकल्यास संबंधित व्यक्तीवर १०० रुपये दंड आकारला जातो. तसेच शेतीचा बांध सांभाळण्याची देखरेख करण्याची जबाबदारी हि जमीनमालकाची आहे परंतु दुसऱ्या कोणीही व्यक्तीने बांधकाम फेरफार केली तर त्याबाबदची तक्रार तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात. दोन्ही बाजूंचा प्रकरण बघून त्यावर निर्णय घेऊन जिल्हाधीकारी शिक्षाही करू शकतात. गरज पडल्यास भूमापन प्रत्यक्ष जागेत केले जाते.

महत्वाच्या बातम्या –