सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पाऊस कोसळणार

पाऊस

मुंबई – राज्यात महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. तर राज्यातील मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर आता राज्यात उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज आणि उद्या राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे आज 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.  या कारणामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर आज आणि उद्या राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव  या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार,पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.