सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज बरसणार मुसळधार पाऊस

पाऊस

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर सध्या पावसाची उघडीप चालू असल्याचे दिसत आहे.

पुढील दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना या महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्यात आजपासून तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यात असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ४ ते ६ सप्टेंबर यादरम्यान राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे. तर राज्यातील बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –