सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पावसासह गारपीट

औरंगाबाद – गेल्या काही दिवसात मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसला आहे. खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाकडून पंचनाम्याचेही काम सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यातच आता मराठवाड्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर आज २६ सप्टेंबर रोजी रविवारी जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर सह औरंगाबाद जिल्हा यवो अलर्टमध्ये आहे. २७ सप्टेंबर रोजी सोमवारी परभणी, नांदेड, उस्मानाबाद मध्ये पावसाची शक्यता आहे. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसू शकतो.

महत्वाच्या बातम्या –