सावधान! राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार शक्यता

पाऊस

औरंगाबाद – गेल्या काही दिवसात मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसला आहे. खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाकडून पंचनाम्याचेही काम सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यातच आता मराठवाड्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर आज  २५ सप्टेंबर रोजी रविवारी जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर सह औरंगाबाद जिल्हा यवो अलर्टमध्ये आहे. २७ सप्टेंबर रोजी सोमवारी परभणी, नांदेड, उस्मानाबाद मध्ये पावसाची शक्यता आहे. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसू शकतो.

अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड मधील मांजरा धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पिके पाण्याखाली गेल्याने अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून पंचनामे करणे सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत आणखी कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –