मुंबई – आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान (Weather) विभागाने दिली आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
देशातील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या भागातही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान (Weather) विभागाने दिली आहे. देशात अनेक ठिकाणी मागील काही दिवसामध्ये या पावसाने जोरदार लावली आहे. तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीटने हजेरी लावली आहे. डिसेंबर महिन्यापासून देशात अनेक ठिकणी पाऊस पडत आहे, २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीटने हजेरी लावली होती. तर जानेवारी महिन्यातही पाऊस सुरूच आहे.
तर देशातील तामिळनाडू, पॉंडेचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येत्या 4 ते 5 दिवसांत या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर
- महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा – जयंत पाटील
- सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे
- काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद
- जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी 308 कोटी 40 लाखाच्या रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता