सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

हवामान

मुंबई –  हवामान (Weather) विभागाचा अंदाजानुसार राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे  आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.. तर राज्यातील नाशिक, नागपूर , पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात काही आठवड्यांपासून खूप थंडी वाढली (very cold) आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा (Temperature mercury) घसरल्याने बऱ्याच भागात आपल्याला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्याचे तापमान(Temperature ) १० अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता एवढ्या थंडीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसरळणार आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते ४ फेब्रुवारी राज्यात पावसाची शक्यता(Possibility) वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात गारठा वाढल्याचे दृश्य आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये खूप थंडी जाणवत असून तर या जिल्ह्यांमध्ये  अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –