काळजी घ्या! जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्ब्ल ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पुणे – पुणे जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या ही वाढत आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता आता हा रेट ५.३ हुन अधिक झाला आहे.

दरम्यान, काल (दि. ०४ जुलै) रोजी पुणे जिल्ह्यात तब्बल ३१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७९ हजार ७३२ इतकी झाली आहे. शहरातील ३२९ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६८ हजार ३३७ झाली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या ही २७०० वर गेलीये. पुणे जिल्ह्यात सध्या २ हजार ७८३ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २९७ रुग्ण गंभीर तर ४३९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –