काळजी घ्या! जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत झाली मोठी वाढ

पुणे – राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, आता हि रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.

तर, पुणे जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली पुणे शहरातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही २००-३०० पर्यंत आली होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.

तर काल (दि. ३० जून) रोजी पुणे जिल्ह्यात तब्बल ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७८ हजार ५१७ इतकी झाली आहे. शहरातील २६६ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६७ हजार ३७२ झाली आहे.

आजच्या रुग्णवाढीमुळे सक्रिय रुग्णसंख्या ही अडीच हजारांवर गेलीये. पुणे शहरात सध्या २५५७ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २८७ रुग्ण गंभीर तर ४२२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –