सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटास जोरदार पावसाची शक्यता

जोरदार

मुंबई : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तर राज्यातील काही भागात चांगलाच जोरदार पाऊस झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. राज्यात पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भात , विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –