सावधान! जिल्ह्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पाऊस

पुणे : मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या पावसानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला असून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून पुन्हा वाऱ्यांना चालना मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –