‘महाराष्ट्र देशा’च्या दणक्या नंतर सरकारला आली जाग ‘त्या’ शेतकऱ्याला मिळणार मदत

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अन्यायामुळे गोरक्षनाथ साळुंखे या शेतकऱ्यावर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याची वेळी आली होती. २३ मार्च पासून हा शेतकरी पुण्यातील साखर संकुल येथे उपोषणास बसला होता. सर्वप्रथम या शेतकऱ्याची विदारक कहाणी ‘महाराष्ट्र देशा’ने राज्यसमोर आणली होती. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत शेतकऱ्याला मदत करण्याच आश्वासन दिल्यानंतर तब्बल ५ दिवसांनी गोरक्षनाथ साळुंखे या लढवय्या शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले आहे.

पहा शेतकऱ्याची व्यथा 

महाराष्ट्र देशाच्या बतमीनंतर स्थानिक आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तातडीने शेतकऱ्याची भेट घेऊन मदतीचे आश्वासन देत थेट सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता.

सभागृहात घेतली शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल 

गावकरी आले धावून

आपल्या गावातील शेतकऱ्याची हाल पाहून नेवासा तालुक्यातील कंगोनी गावातील गावकऱ्यांनी थेट पुणे गाठले आणि या लढवय्या शेतकऱ्याच्या लढ्यात सामील झाले अखेर साखर आयुक्तांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर साळुंखे यांच्यासह गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

काय आहे प्रकरण

नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकरी गोरख साळुंखे यांनी विरोधी पक्षात काम केले म्हणून मुळा कारखान्याकडे नोंद असतानाही कारखाना प्रशासनाने त्यांच्या ऊसाला तोड दिलीच नाही. गोरख साळुंखे यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हि अतिशय हालकीची असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच उसावर होणार होता. ऊसाल तोड येईल व पाच पैसे मिळतील अशी आशा होती. सदर घटनेप्रकरणी शेतकरी साळुंखे यांनी कारखाना प्रशासनाला ऊसाला तोड मिळण्यासाठी संपर्क साधला असता शेतात गाड्या जाणारच नाही, थोडं थांबा, तर कधी थेट ऊसाला तोड मिळणारच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे कारखाना प्रशासनाने दिली.

दरम्यान, याविरोधात शेतकरी साळुंखे यांनी साखर आयुक्तालयात धाव घेतली आणि अडीच एकराचा ३ वर्षाचा मोबदला या शेतकऱ्याला अवघे २५ हजार रुपये मिळाला. त्यामुळे मागील ३ वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या या शेतकऱ्याला अखेर २३ मार्च पासून न्यायाची हाक मारण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसाव लागलं होत.