नांदेड जिल्ह्यात ‘पंतप्रधान किसान सन्‍मान निधी योजने’चा साडेचार लाख शेतकऱ्यांना लाभ

शेतकरी

नांदेड – शेतकऱ्यांना निश्‍चित उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी पंतप्रधान किसान सन्‍मान निधी योजना सुरु करण्‍यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची माहिती अपलोड करायची आहे. संपूर्ण माहिती अपलोड झाल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ७५८ शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. त्यामध्ये अजूनही सहा हजार ७९२ खात्यांतील नावात आधार नुसार दुरुस्ती करण्याचे काम शिल्लक आहेत. जिल्‍ह्यातील चार लाख ४६ हजार ७५८ पात्र लाभार्थी शेतकरी कुटूंबाची माहिती ही अपलोड करण्‍याचे काम पूर्ण झाले आहे.

हिरवे वाटाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

या निधीचे हप्‍ते हे सुरळित चालू राहण्‍यासाठी शेतकऱ्यांना त्‍यांचे पोर्टलवरील नाव हे आधार कार्डवरील नावाप्रमाणे आहे का, ते जवळच्‍या सेतु सुविधा, सीएससी केंद्रात तपासावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले. तसेच माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्‍मान निधी रक्‍कम हप्‍तेनिहाय मिळाली. तसेच जर शेतकऱ्यांची पोर्टलवरील नोंदणी ही आधार कार्डवरील नावाप्रमाणे नसेल तर त्यांचे पुढील हप्‍ते थांबविण्‍यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डवरील नावाप्रमाणे पीएम किसान पोर्टलवर आपल्या नावात सुधारणा करावी.

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

शेतकरी हे स्‍वतः देखील आधारप्रमाणे नावात सुधारणा करू शकतात त्यासाठी त्यांना www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यावरील उजव्‍या बाजूला Farmers Corner येथे क्लिक करा. तेथे क्लिक केल्‍यावर येणाऱ्या विविध पर्यायांपैकी Edit Adhar Failure Record यावर क्लिक करावे. आलेल्‍या स्क्रिनवर Aadhaar नंबर टाकावा. त्यानंतर त्यांना यापुर्वीचे नोंदविलेले नाव व इतर माहिती दिसेल. या नावापुढे असलेल्‍या रिकाम्‍या जागी शेतकऱ्यांनी आपल्‍या आधार कार्डवर असल्‍यानुसार तंतोतंत नाव टाईप करुन अपडेट बटनवर क्लिक करावे.

महत्वाच्या बातम्या –

देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये