बेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यासह गिरणा परिसरातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने सहकार महर्षि तथा माजी आमदार स्व.रामराव दगडू पाटील, उंबरखेडे ता.चाळीसगाव यांनी या कारखान्याची उभारणी केली. संन १९७७ साली पहिला गळीत हंगाम सुरु केला होता. त्यानंतर बरीच वर्ष कारखाना सुरळीत चालला. मात्र गेल्या ८ ते ९ वर्षापासून कारखाना वाढता कर्जाचा डोंगर व काही वेळेस ऊस ची परवड होत असल्याने लागवड कमी होणे यासह विविध कारणांमुळे कारखाना बंद पडला. मध्यन्तरी निवडणूक होऊन चित्रसेन यशवंतराव पाटील हे चेअरमनपदी विराजमान झाले.त्यानी आपल्या सहकारी संचालक व शिरपुर येथील व्ही.यु.पाटील यांनी गुजरात मधील डभोइवाला यांच्या अर्थिक सहकार्याने कारखाना सुरु करुन यशस्वीरीत्या हंगाम पार पाडला होता. ते 1 वर्ष वगळता कारखान्याच्या धूराळा ऊडाला नाही.
सद्यस्थितीत कारखाना विक्रीप्रक्रियेत न्यायालयीन लढतीत अटकला होता. कारखाना सुरु झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोड़ मजूर वर्ग ,छोटे मोठे व्यावसायिक तसेच बेरोजगार युवक याना सुगीचे दिवस येतील.उसाला चांगला भाव मिळेल.एवढे मात्र निश्चित.