Best Mileage Bike | ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक

Best Mileage Bike | 'या' आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आपल्या कंपनीच्या बाईक (Bike) मध्ये सर्वोत्तम मायलेज (Best Mileage) देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर तुमच्या बाईकच्या कमी मायलेज (Mileage) मुळे चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वोत्तम बाईक मॉडेल्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

सर्वोत्तम मायलेज (Best Mileage) देणाऱ्या बाईक

बजाज सिटी 110 (Bajaja City 110)

बजाजच्या बजाज सिटी 110 या मध्ये 115.45cc BS6 इंजिन उपलब्ध आहे. जे 8.48bhp पॉवर आणि 9.81 टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 59,041 एवढी आहे. त्याचबरोबर ही बाईक 70kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

हिरो एचएफ डीलक्स (Hero HF Deluxe)

हिरोची हिरो एचएफ डीलक्स ही बाईक पाच प्रकारामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही बाईक बाजारामध्ये दहा रंगांच्या पर्यायांमध्ये आहे. या हिरो बाईकमध्ये 97.2cc BS6 इंजिन आहे. जे 7.91bhp पॉवर आणि 8.05Nm टार्क निर्माण करू शकते. या बाईकची किंमत 54,358 रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर ही बाईक 65kmpl मायलेज देऊ शकते.

होंडा एसपी 125 ( Honda SP 125)

होंडाची होंडा एसपी 125 ही बाईक 124cc BS6 इंजिनसह बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 10.72bhp पॉवर आणि 10.9 टार्क निर्माण करू शकते. होंडाच्या या बाईकची सुरुवातीची किंमत 82,775 आहे. त्याचबरोबर ही बाईक 65kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

बजाज प्लेटिना 110 (Bajaj Platina 110)

बजाजची बजाज प्लेटिना 110 बाजारामध्ये 115.45cc BS6 इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 8.44bhp मॅक्झिमम पॉवर आणि 9.81Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या गाडीमध्ये पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. ही बाईक बाजारामध्ये 67,119 रुपयांपासून उपलब्ध आहे. ही बाईक 70kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

महत्वाच्या बातम्या