Best Mileage Car Option | टीम महाराष्ट्र देशा: देशाला गेल्या काही काळापासून कार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत कार उत्पादक कंपनी त्यांचे नवनवीन कार मॉडेल बाजारात लाँच करत असते. या वाढत्या कारच्या विक्रीमुळे कार उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांना बेस्ट फीचर सोबतच बेस्ट मायलेज (Best Mileage Car) देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण कार खरेदी करताना आपण मायलेजला सर्वाधिक महत्त्व देतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला देशात सर्वोत्तम मायलेज असलेल्या कार बद्दल सांगणार आहोत.
‘या’ आहेत बेस्ट मायलेज कार (Best Mileage Car)
मारुती ग्रँड विटारा हायब्रीड
मारुतीची मारुती ग्रँड विटारा हायब्रीड ही देशातील सर्वोत्तम मायलेज देणारी कार आहे. या कारमध्ये 1.5L Atkinson TNGA पेट्रोल इंजन आहे, जे 1155bhp ची मॅक्सीमम पॉवर जनरेट करते. मारुतीची हि SUV 27.97kmpl पर्यंत मायलेज देते. या कारची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख एवढी आहे.
टाटा अल्ट्रोज
टाटा अल्ट्रोज ही टाटा मोटर्स एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. टाटाची ही कार आपल्या मायलेज आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहे. ही कार देशातील सर्वात कार्यक्षम मायलेज देणाऱ्या कारमध्ये गणली जाते. टाटा मोटर्सची अल्ट्रोज ही कार 26 किमी प्रतिलीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.
टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर
टोयोटा कंपनीची टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर ही कार हायब्रीड पॉवरट्रेनसह आहे. ही कार त्याच्या मायलेजमुळे लोकप्रिय होत चालली आहे. या कारला प्रति लिटर 27 किलोमीटर पेक्षा जास्त मायलेज मिळू शकते.
टाटा नेक्सॉन डिझेल
टाटा नेक्सॉन डिझेल (21.5kmpl) या कारची गणना देशातील सर्वात सुरक्षित कारमध्ये होते. या SUV चे डिझेल ऑटोमॅटिक वेरियंट 21.5 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असून ते 110 bhp पॉवर जनरेट करते. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.60 ते 14.08 लाख रुपये एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | शाईफेक प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं…”
- IND vs AUS | हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मंधानाने केली ‘ही’ कामगिरी
- IND vs BAN | पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहित, जडेजा आणि शमीच्या जागी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
- Maharashtra Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- Nana Patole | “छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते”; नाना पटोलेंचं मोठं विधान