भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही

उतारा तपासणी यंत्रणा

पुणे : एफआरपीचा दर हा त्या साखर उताऱ्यावर ठरत असतो. पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही त्यामुळे तशी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने केली. तसेच कारखान्याकडून एफआरपी रक्कम थकीत असल्या कारणाने  सुमारे एक हजार कामगारांचे वेतन हे थकीत आहे. ते पूर्ण थकीत वेतन हे २७ महिन्याचे आहे. आधी ते पूर्ण वेतन त्वरित देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

त्यावेळी सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार केला असता आयुक्त सौरभ राव म्हणाले की, थकीत एफआरपी प्रश्नी जप्तीची कारवाई आणि अन्य मागण्यांबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल.

प्रहार संघटनेचे शंभूराज खलाटे यांनी सांगितले की, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी  ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच ते ह्या कारखानदारीतील व्यक्तीमत्व आहे. चालू वर्ष तसेच मागील थकीत एफआरपीची रक्कम पाहिल्यास ती सुमारे चारशे कोटींच्या आसपास आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपीची थकीत रक्कम संबंधित कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशीही मागणी आयुक्तांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख

साथीच्या आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य खात्याचे नवीन पाऊल

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री