मोठा निर्णय – मोदी सरकारने केले पेट्रोल – डिझेल आणि गॅस स्वस्त : वाचा सविस्तर !

मोदी सरकार

दिल्ली – सतत इंधन(Fuel) दर वाढ, तसेच प्रचंड होत असलेली महागाई गॅस(Inflation gas) १००० रुपये पार , यामुळे सर्व नागरिक तसेच गृहिणी यांच्या खिश्याना कात्री बसत होती. परंतु शनिवार दिनांक २१ रोजी मोदी सरकारने खूप मोठा निर्णय घेतला असून पेट्रोल आता प्रितिलीटर ९. रुपये तर डिझेल दर हे ७ रुपयांनी कमी होणार आहेत.तसेच गॅस सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

गॅस सबसिडी साठी १२ सिलेंडर पर्यंत अट ठेवण्यात आली आहे. भारतातील जवळ जवळ ९ कोटींहून जास्त नागरिकांना ह्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हि आर्थिक फटका(Economic blow) बसणार असून ६ हजार कोटी रुपयांचे नुकसान सरकारला सहन करावे लागणार आहे.

मोदी सरकारने केंद्रीय अबकारी करात कपात केल्यामुळे इंधन दर स्वस्त होण्यास मदत झाली आहे. तसेच त्याच बरोबर मोदी सरकारने राज्यांनाही इंधन(Fuel) दर कमी करावे असे आदेश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –