मुंबई : राज्यातील जे शहर सिटी सर्व्हेमध्ये लागले त्या शहरात जमीनीचा सातबारा उतारा अजुनही सुरु आहे. या शहरात शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शहरातील शेतजमीनींचा सातबारा उतारा (Satbara Utara) बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सातबाऱ्यांचं प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर होऊनही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सर्व शहरांतील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासह सांगली, मिरज, नाशिकमधून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल. सिटी सर्व्हे झाल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत. सिटी सर्व्हे झाला. पण सातबारा उतारा नाही, अशाही काही जमिनी आहेत. यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले असून न्यायालयात खटल्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब
- कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत – नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज