मोठा निर्णय – दुकानदारांना मिळणार आता निवृत्ती वेतन !

दुकानदार

दुकानदारांना मिळणार पेन्शन हि बातमी छोट्या व्यापारांसाठी अत्यंत महत्वाची आहे.

दिल्ली – आधी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना(National Pension Scheme) सुरु केली होती. त्याचा लाभ फक्त नोकरदार व्यक्तींनाच मिळत होता परंतु आता शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारांना हि योजनेचा लाभ मिळणार आहे.

बघुयात कोणाला मिळणार पेन्शन – राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार करणाऱ्या(Retailers, shopkeepers and self-employed) वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यांनतर दरमहा किमान ३००० रुपयांची पेन्शन(Pension) मिळणार आहे.

परंतु नोंदणी करून मृत्यू झाल्यास(In case of death), लाभार्थीने नॉमिनी केलेल्या व्यक्तीला अर्जदाराच्या पेन्शनपैकी ५० टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन(Pension)म्हणून दिली जाणार आहे.
त्यासाठी कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड व जन – धन खाते क्रमांक असणे गरजेचे असणार आहे. तसेच काही नियम(condition) हि घालून देण्यात आले असून नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा (व्यावसायिक) उलाढाल हि किमान दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असायला हवा.

कोण करू शकते नोंदणी(Who can register?) – वयाची अट देण्यात आली असून १८ ते ४० वयोगटातील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकते.
सरकारने वेबसाईट जरी केली असून अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लीक करा – maandhan.in 

महत्वाच्या बातम्या –