‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!

कोरोना

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थितीआटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तर, कोरोना मुक्तांचा आकडा हा नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये देखील घट होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार २४० नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, २ हजार ५८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबई शहरात सध्या एकूण ३४ हजार २८८ रुग्ण आहेत. येणारे दोन आठवडे हे मुंबईसह महाराष्ट्रासाठी महत्वाचे असून रुग्णसंख्या अधिक वेगाने कमी झाल्यास सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

महत्वाच्या बातम्या –