राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं होतं. मात्र, ४० हजारांखाली गेलेला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असल्याने योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांचा आलेख हा वाढताच आहे.

राज्यात आज दिवसभरात नव्याने ४६ हजार ७८१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ५८ हजार ८०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्याने किंचित दिलासा मिळाला आहे. सध्या ५ लाख ४६ हजार १२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार ? राजेश टोपेंचे संकेत !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली आहे. ‘सात लाखांवरील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आता चार लाखांवर आली आहे. तरीदेखील स्थिती आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढवावा अशी चर्चा झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय जाहीर करतील.’ असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –