मोठी बातमी – उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार कडक लॉकडाऊनची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला गेला आहे.

महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने आता महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आणि त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे हे या कडक लॉकडाऊनची घोषणा करतील अशी माहिती सध्या मिळत आहे. आज महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती. यामध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबाबतची नियमावली काही तासातच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.

महत्वाच्या बातम्या –