मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १५ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

जमावबंदी

सोलापूर : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता राज्यातील विविध भागांमध्ये स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. त्यानंतर आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आहे. 8 मे रात्री आठपासून 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन असणार आहे. हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात आज तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण 85.54% एवढा झाला आहे. तर आज राज्यात दरम्यान आज 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –