मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यातील कोरोना कहर; आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील पुण्यासह राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

पुणे शहरात आज नव्याने ६ हजार ६२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ९० हजार ०४४ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ७६२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ४२ हजार ६५२झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात १७ हजार ७७४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १५ लाख ५७ हजार ६२७ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४१ हजार ९४० रुग्णांपैकी ९०१ रुग्ण गंभीर तर ३,८७६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ४५२ इतकी झाली आहे. राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –