मोठी बातमी – शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार, तब्ब्ल ५० हजार शेतकरी दिल्लीकडे रवाना

शेतकरी

नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येणार आहे. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे जथ्थे दिल्लीच्या सीमांवर पोहोचण्याच्या तयारीत आहेत. जवळपास ५० हजार शेतकरी दिल्लीत पोहोचलेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सर्व सीमांवर तैनाती वाढवली आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना पानिपत टोल प्लाझा येथून सिंघू बॉर्डरवर येण्यास सांगण्यात आले होते, पण त्यांच्या पोस्टरमध्ये दिल्लीला जाण्याचाही उल्लेख होता. त्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाझीपूरमध्ये आंदोलन स्थळांसहित दिल्लीला येणाऱ्या सर्व रस्त्यांवर २४ तास सतर्कता आणि तैनाती वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहेत. शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर आंदोलन करत आहेत.

चर्चा केव्हा करायची आहे, हे सरकारने सांगावे
शेतकऱ्यांशी चर्चा करू या केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या वक्तव्यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘चर्चा केव्हा करायची आहे, हे सरकारने सांगावे. थेट न बोलणे आणि इतरांचे न ऐकणे यात भाजप नेते प्रशिक्षित आहेत. आम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केला. शेतकरी आंदोलनाला तर आता कुठे सहा महिनेच झाले आहेत.’

महत्वाच्या बातम्या –